क्षितीज सामोरी दिसत आहे पण मन अशांत एवढे
सावली तर नाही ही मृगजळाची... असे हळूच मनी वाटे
कधी कसा कोणास ठाऊक झरकन वर आला
पाण्यावरुनी वाहत येयूनी अंग शहारून गेला
सावली तर नाही ही मृगजळाची... असे हळूच मनी वाटे
कधी कसा कोणास ठाऊक झरकन वर आला
पाण्यावरुनी वाहत येयूनी अंग शहारून गेला
अचानक एवढा आनंद समोर ...खरा वाटत नाही
पण डोळ्यांमधला ओलावा आनंदाची चाहूल देऊनी जाई
त्याच्या सावलीत सुखाचे क्षण मी शोधते आहे
आणि स्वप्न बघत मी आयुष्याचे चित्र रंगवत आहे
पण डोळ्यांमधला ओलावा आनंदाची चाहूल देऊनी जाई
त्याच्या सावलीत सुखाचे क्षण मी शोधते आहे
आणि स्वप्न बघत मी आयुष्याचे चित्र रंगवत आहे
प्रत्येक गोष्ट मला त्याची आवडतेच असे नाही
पण त्याच्याशी बोल्याखेरीज आता दिवसच पूर्ण होत नाही
बरेचदा वाटतं विचारू त्याला का तू असा वेगळा
क्षणात माझा एकटा आणि क्षणात इतका पारका
पण त्याच्याशी बोल्याखेरीज आता दिवसच पूर्ण होत नाही
बरेचदा वाटतं विचारू त्याला का तू असा वेगळा
क्षणात माझा एकटा आणि क्षणात इतका पारका
काय सांगू कसे सांगू तुला, ते मला कळत नाही
पण तुला सांगितल्याखेरीज आता काही गत्यंतरच उरले नाही
तू समजून घेशील मनात अशी वेडी आशा वाटे
याच आशेत मी एकं एकं दिवस मोजते आहे
पण तुला सांगितल्याखेरीज आता काही गत्यंतरच उरले नाही
तू समजून घेशील मनात अशी वेडी आशा वाटे
याच आशेत मी एकं एकं दिवस मोजते आहे
सांगीन तुला मी एकं दिवस काय मनात माझ्या आहे
आणि त्या वळणावर आयुष्याच्या मी वाट तुझी पाहेन !!!
आणि त्या वळणावर आयुष्याच्या मी वाट तुझी पाहेन !!!
No comments:
Post a Comment